Ad will apear here
Next
महाराष्ट्र केसरी चौधरींना नियुक्तिपत्र
विजय चौधरी यांना नियुक्तिपत्र देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरी किताब मिळवलेल्या जळगावच्या विजय चौधरी यांची राज्य पोलीस दलात उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी चौधरी यांना नियुक्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत जळगावचे कुस्तीपटू विजय चौधरी यांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब पटकावला होता. ‘महाराष्ट्र केसरी विजेत्याला पोलीस दलात नोकरी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. महाराष्ट्रात कुस्तीला प्राधान्य देऊन खेळाडूंना जी काही मदत लागेल, ती राज्य सरकार करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्ती करून चौधरी यांची राज्य पोलीस दलात उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZWBBC
Similar Posts
‘सीएम’च्या वाढदिवशी महामृत्युंजय जप नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची सर्व प्रकारची विघ्ने टळावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २१ जुलैला महामृत्युंजय जप व पूर्णाहुती यज्ञ करण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने प्रभागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याखेरीज विविध आघाड्यांच्या वतीने
साकारले पहिले ‘पुस्तकांचे गाव’ मुंबई : भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन येत्या चार मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ या अभिनव स्वरूपात पुढे येत आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ किलोमीटर
पर्यटकांसाठी रायगडावरील ‘ई-बुक’ रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘रायगड : पर्यटन विविधा’, या ‘ई-बुक’चे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या ‘मोबाईल ॲप’चेही या वेळी उद्घाटन करण्यात आले
हमीभावापेक्षा कमी भावाने शेतीमाल खरेदी ठरणार गुन्हा मुंबई : राज्यात शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणे गुन्हा ठरणार असून, त्या संदर्भात राज्य सरकार कायदा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी नुकत्याच झालेल्या गटशेतीच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. ‘गटशेती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी साह्यभूत ठरणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language